ओढणीने घेतला नवविवाहितेचा बळी

___ठाणे: पतीसोबत दुचाकीवरून निघालेल्या नवविवाहितेची ओढणी | दुचाकीच्या चाकात अडकल्याने रस्त्यावर कोसळली आणि त्याचवेळी | मागून आलेल्या टेम्पोने तिला चिरडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्रकार गुरुवारी । सायंकाळी घडला.कीर्ती जाधव (२२) असे मृत नवविवाहितेचे नाव असून | ती चिंचवली येथील राहणारी होती. सायंकाळी पतीसोबत कल्याण येथील | नातेवाईकांस भेटण्यासाठी त्या येवई-पिसे रोडवरून दुचाकीवरून निघाल्या | होत्या. परंतु भावाळे गावाजवळील ऑलसेंट इंग्लिश स्कूलसमोर त्यांचा | अपघात झाला. या प्रकरणी पघडा पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात | गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवली येथील राहणारे देवेंद्र आणि | त्यांच्या पत्नी किर्ती जाधव कल्याण येथील रुग्णालयात दाखल असलेल्या भावाच्या मुलाला पाहण्यासाठी गुरुवारी सायंकाळी कल्याणला निघाल्या | | होत्या. पिसे रोडवरीलभावाळे गावानजीक दुचाकीच्या चाकात तिची ओढणी | अडकली आणि ती दुचाकीवरून रस्त्यावर पडली. त्याच वेळी पाठीमागून | येणारा टेम्पो तिच्या अंगावरून जाऊन ती गंभीर जखमी झाली. तिला जखमी | अवस्थेत भिवंडीतील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.